https://www.facebook.com/groups/231887504771632/permalink/809258247034552/?app=fbl

गुरुद्वादशी
*********
वाडीचा तो वारा येऊन भरारा
स्पर्शतो मजला हळुवार ॥
तिथे तो बोचरा तिखटच जरा
सोसवतो बरा या देशात ॥
करतसे वार्ता तिथल्या भक्तांची
पूजा पालखीची प्रसादाची ॥
आणतसे गंध तिथल्या फुलांचा
कर्पूर धुपाचा पाजळल्या ॥
जाणवतो पाया स्पर्श त्या घाटाचा
प्रदक्षिणा पथाचा वारंवार ॥
म्हटलो देवाला यावे भेटायला
तुम्हीच जीवाला एक वार ॥
मग दरवळ दाटला भोवती
मनोहर मूर्ती नयनात ॥
कानी खळखळ कृष्णेचा आवाज
हृदयात गाज भजनाची ॥
घणाणली घंटा गुरुदेव दत्त
अद्भुत हा नाद रोमरोमी ॥
विक्रांत मनात द्वादशी पहाट
उतरलो घाट कृष्णाईचा ॥
सरले संकल्प मोडले विकल्प
मन निर्वीकल्प दत्त पदी॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

🙏🚩॥ अमृतवाणी॥🚩🙏
भगवंताचे विशेषता आहे की , भगवंत कोणावरही शासन करत नाहीत , कोणा भक्ताला आपला दास बनवत नाहीत , कोणाला आपला शिष्य बनवत नाहीत , तर प्रत्येकाला आपला मित्र बनवतात , आपल्या सारखे बनवतात . म्हणून भगवंताला जीवाचा सखा म्हटले आहे .
भगवंत सतत मित्रगत आपल्या बरोबर असता . त्याच्या शिवाय दुसर्‍या कोणाचीच संगत अखंड लाभत नसते . मनुष्याला जाणीव असो नसो पण भगवंत त्याचे पालन पोषण करतो या अर्थाने तो माता पिता आहेच . भगवंत हा माता पिता भ्राता आणि सखा आहे .
श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो .
🙏 श्रीकृष्ण सावरगांवकर
२३/१०/२०२२
🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩

Related Posts